Home सामाजिक विसापुरात राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव

विसापुरात राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव

1197

पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष

महिला मेळाव्यातून तुकडोजी महाराजांच्या जीवनावर टाकला प्रकाश

विसापूर : येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रम रविवारी पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथील आयोजित महिला मेळाव्यातून तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. दरम्यान पालखी मिरवणूकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बालकांनी संताची वेशभूषेत, त्यांच्या कार्याचा संदेश दिला.

.     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून संतांच्या प्रतिमेसह पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मुख्य मार्गांनी मिरवणुकीचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामस्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून प्रत्यक्ष स्वच्छतेचा संदेश दिला.

.       दरम्यान महिला मेळा घेण्यात आला. आशा टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मेळाव्यातून तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. यावेळी महिला वक्त्यांनी संतांचे विचार प्रगल्भ व समाजाला दिशा देणारी, असल्याचे सांगितले. भिवराबाई आत्राम यांचे काव्य गुरुदेव भक्तांना अधिक भावले.सर्व धर्म सभा पंढरी गुजरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी आप आपल्या धर्माचे विवेचन करून प्रबोधन केले.

.      सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अमोल बुटले, रामदास बावणे,रामदास हरणे, बालाजी शेंडे, महादेव निपुंगे, उद्धव गिरसावळे,सूर्यभान काकडे, जनार्धन काकडे, रविंद्र पेटकर, अनिल टोंगे, सदानंद क्षीरसागर, दिनेश क्षीरसागर, सुभाष हरणे, कविता क्षीरसागर, विजया मारबते,सौरभ गिरसावळे,विश्वास गिरसावळे श्रेयश ढवस,सुचिता हरणे, रमेश बावणे आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!