Home सामाजिक प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही : संजय गजपुरे

प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही : संजय गजपुरे

1095

नागभीड : प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत विजयाच्या संकल्पाची मशाल प्रज्वलित करा , त्यानंतर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही असे प्रतिपादन चंद्रपुर जि.प.चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी तालुका स्तरीय बालक्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

.     नागभीड तालुक्यातील बोंड येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत आयोजित तालुकास्तरीय शालेय बालक्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बोंड च्या सरपंच निशाताई जयतराम सिडाम या होत्या. उपस्थित अतिथींच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलीत केल्यानंतर पथसंचलानाद्वारे विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.

.    यावेळी मंचावर उपसरपंच जगदिश पाटील राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भंडारे, पंचायत विस्तार अधिकारी धुर्वे, माजी पंचायत समिती सदस्या मायाताई राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद गोहणे, उपाध्यक्ष मोहिनी मोरांडे, ग्रा.पं.सदस्य जयतराम सिडाम, अतुल नागोसे, शितल राऊत, ग्रामसेवक प्रशांत दोडके, तंटामुक्त समिती अध्यक्ष ज्ञानदेव रहाटे, माजी सरपंच विनोद तुपट व उज्वला बनकर, बाळापुर बुज चे माजी सरपंच धनराज बावनकर व विनोद गोंगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

.     या उद्घाटन सोहळ्याचे संचालन धुर्यकान्त बनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रप्रमुख भारत बोरकर यांनी मानले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी स्वप्नपुर्ती गृपच्या युवक व युवतींचे विशेष सहकार्य लाभले असून गावातील सर्व बचत गट यांचीही मदत घेण्यात आली आहे.

error: Content is protected !!