आज मुख्य कार्यक्रम:अनुयायांच्या स्वागतासाठी साधनाभुमी सज्ज
आशिष गजभिये
चिमूर : सम्राट अशोकाच्या काळापासून बुद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान – साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभुमित दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विदिवसिय धम्म समारंभ आयोजित केला जातो.यात देश – विदेशातील धम्म समारंभ उपस्थित असतात.दरम्यान गुरुवारी दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यक्रमाकरीता हजारो धम्मबांधव दाखल झाले असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे.
. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘ मूकनायक ‘ हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्राम लढवून समजाला समतेचा सूर्य दाखविला.याच दिनाच्या स्मरणार्थ व महामानवाच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीला करून देण्यासाठी व महामानवाला अभिवादन करण्यासाठी मागील ३० वर्षापासून महाराष्ट्र उपासक – उपसिका संघाच्या वतीने संघभुमित पहाडीवर दोन दिवसीय धम्म समारंभाचे आयोजन केले जाते. मागील आठवडाभरापसून अखंड सुत्तपठण या संघाभुमित सुरू असून द्वीदिवसिय विविध कार्यक्रम या ठिकाणी सुरू असून शुक्रवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाकरिता लाखो धम्म बांधव धम्म समारंभात समाविष्ट होऊन महामानवाला अभिवादन करून एक नवी ऊर्जा घेऊन जातात शुरक्रावरच्या मुख्य कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित राहणार आहेत.
विविध सामजिक संघटनांकडून भोजनदान धम्म समारोहासाठी विविध भागातून उपस्थित असणाऱ्या धम्म बांधावकरिता परिसरातील सामजिक संघटना कडून भोजनादन अल्पोपहराचे स्टॉल विविध ठिकाणी लावण्यात आले. तर आयोजकडून चोवीस तास भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर अनेक सामजिक संघटना कडून मोफत रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सफाई व मार्गदर्शना करीता धम्मसेवक दोन दिवस संघभूमित विविध कार्यक्रम असतात यात हजारो धम्माबांधव सहभागी होत असतात. अनेकांना या परिसरात असणाऱ्या जंगली श्वापदे यांचा वावर असलेली ठिकाणे अनभिज्ञ असतात त्यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व परिसराची स्वच्छ्ता राखण्यासाठी शेकडो स्वयंसेवक स्वयफुर्ती ने धम्मसेवा करीत आहेत.


