वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या बालक्रीडा तालुका महोत्सवाची उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले.
. बीड स्तरीय शालेय क्रीडा मंडळाचे खेळ नुकतेच पार पडले बिट स्तरीय सामन्यातून पात्र झालेल्या खेडाळूना तालुकास्तरावर खेळण्यासाठी खेमजई या गावात तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
. यावेळी उदघाटक म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार करण देवतळे, पंचायत समिती संवर्ग अधिकारी, गजानन मुंडकर, चहारे, येथील येथील सरपंच मनीषा चौधरी, चंद्रहास मोरे , प्रमोद गंपवार,रविंद्रजी रणदिवे, सतीश अघडते पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी लांडे, मुंडकर, केंद्रप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा प्रमुख तसेच शालेय विध्यार्थी आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


