Home सामाजिक विद्यार्थ्यांना महाराणा प्रताप यांचेअदम्य साहस प्रेरणादायी

विद्यार्थ्यांना महाराणा प्रताप यांचेअदम्य साहस प्रेरणादायी

1161

अश्विनी सोनवणे यांचे प्रतिपादन

सन्मित्र सैनिकी विद्यालयात कंपनी दिन साजरा

बल्लारपूर : महाराणा प्रताप यांचे जवळ अफाट साहस होते.त्यांनी जीवनाच्या वाटचालीत हाल सहन केले. परंतु अकबरांचे मांडलिकत्व अंगिकारले नाही.हल्दीघाटीच्या युद्धातील प्रसंग याला साक्षी आहे.त्या रणसंग्रामातील शौर्य आजही प्रेरणा देणारे आहे.चेतक घोड्यावरील त्यांचे पुत्रवत प्रेम सर्वश्रुत आहे.मुक्या प्राण्यांची स्वामीनिष्ठा देखील अवर्णनीय ठरली. यामुळे आजही विद्यार्थ्यांना महाराणा प्रताप यांची निष्ठा प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे केळकर यांनी सन्मित्र सैनिकी विद्यालयात केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील सन्मित्र सैनिकी विद्यालयात महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त कंपनी दिन साजरा करण्यात आला.या शाळेत महाराणा प्रताप नावाची विद्यार्थ्यांची कंपनी आहे. यानिमित्त कंपनी दिवसाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुंधती कावडकर होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे,मोहन पाठक,गौरी तेलंग यांची उपस्थिती होती.

.        दरम्यान सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या तुकडीने मानवंदना देण्यासाठी पथसंचलन केले. यावेळी वर्ग दहावीचा गौरव उपाध्याय व आठवीचा साहील उरकुडे या विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर प्रकाश टाकून महाराणा प्रताप यांच्या मातृशक्तीचे स्मरण सदैव करण्यासंदर्भात मत व्यक्त केले. ‘वाघाच्या जबड्यात घालून हात’ या सांघिक गीताने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राकेश बुटले यांनी केले. यावेळी शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!