Home सामाजिक भटाळीच्या सरपंचाला ‘विशेष अतिथी’ म्हणून दिल्लीत निमंत्रण

भटाळीच्या सरपंचाला ‘विशेष अतिथी’ म्हणून दिल्लीत निमंत्रण

1151

प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमाला राहणार उपस्थित

चंद्रपूर : प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती,पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे सर्वांनाच शक्य होत नाही. आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा बहुमान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचाला मिळणार आहे. हा बहुमान यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर यांना मिळाला आहे.

.     केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून ग्रामीण पातळीवर राबवण्यासाठी असलेल्या योजना व या योजनांची अंमलबजावणी योजनांमध्ये असलेला लोकसहभाग त्यासाठी केलेले प्रयत्न आदी निकष निश्चित करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली होती. त्यांच्याकडून यासाठी माहिती मागविण्यात आली होती.

.       या ग्रामपंचायतींमधून जिल्ह्यातील भटाळी या एकमेव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान घरकुल योजना उज्वला गॅस योजना, राज्य शासनाची रमाई घरकुल योजना, लाडकी बहीण योजना आदी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळेच या ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाला आहे. तसें पत्र चंद्रपूर जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडून भद्रावती पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आले. त्यांनी सरपंच सुधाकर रोहणकर यांना या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार २६ जानेवारी २०२५ रोज रविवारला नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सरपंच सुधाकर रोहणकर आणि त्यांच्या पत्नी ग्रा. पं. सदस्या निलिमा रोहणकर उपस्थित राहणार आहे.

error: Content is protected !!