परळी : शहराला गेल्या दीड वर्षा पासून रेल्वे बायपास मंजुरीचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय कार्यालयाला दिला आहे.
रेल्वेत सुधारणा होण्यासाठी, परळी शहराला दुसरे रेल्वे स्टेशन ची मागणी काही नागरिकांनी डिव्हिजन कडे केली आहे त्यानुसार या रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव परळी येथील उपविभागीय कार्यालयात मंजुरीसाठी देण्यात आला आहे. या प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बिदर कडे, हैदराबाद कडे पुणे पनवेल किंवा लातूर कडे जाण्यासाठी रेल्वे गाडीला या दुसर्या तयार होणार्या रेल्वे स्टेशनमुळे अर्धा तास यापुढे थांबण्याची गरज रेल्वेला पडणार नाही या सर्व बाबीचा विचार करून रेल्वे डिव्हिजनच्या ऑफिसने हा प्रस्ताव मंजुरी करीता पाठविण्यात आला आहे.
. परळी शहराला रेल्वे बायपास होताना दुसरे रेल्वे स्टेशन होणे परळी शहराच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे, यामुळे परळी शहराचा एरिया वाढेल त्यामुळे या बायपास परिसरात दोन किलोमीटर जागेलाही मागणी वाढेल या मागणीत इतर कोणत्याही घराची जागा जाणार नाही आहेत त्याच जागेतून सिमेंट फॅक्टरी च्या परिसरातून बायपास वैजवाडी मार्गे काढण्यात येण्याचा प्रस्ताव ठेवण्यात संदर्भात काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा चालू केला आहे.