Home सामाजिक नागभीड तालुक्यातील ९० विद्यार्थ्यांनी दिली भारत टॅलेंट सर्च परीक्षा

नागभीड तालुक्यातील ९० विद्यार्थ्यांनी दिली भारत टॅलेंट सर्च परीक्षा

1130

इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागभीड : सध्याच्या युगात बालवयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. या उद्देशातून त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी. या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येनोली माल येथील शिक्षिका करुणा सोनटक्के यांच्या समन्वयातून रविवार ला दिनांक १९ जानेवारी रोजी भारत टॅलेंट सर्च ही परीक्षा नागभीड येथील सरस्वती ज्ञानमंदिर केंद्रावर पार पडली. तब्बल ९० विद्यार्थ्यांनी या परीक्षेतून आपले टॅलेंट आजमावले आहे.

.      सध्याच्या स्पर्धा परीक्षांच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षण विषयी माहिती असणे गरजेचे आहे. या हेतूने यावर्षी पासून बीटीस म्हणजे भारत टॅलेंट सर्च ही बालवयासाठी जनरल नॉलेज तसेच इतर उपयुक्त विषयांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात येते यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

.       या परीक्षांमध्ये भाषा परिसर अभ्यास, गणित, विज्ञान, भूगोल अश्या विषयांमध्ये परीक्षा होते. पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ भाषा गणित आणि परिसर अभ्यास पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा गणित, विज्ञान, भूगोल आणि सातवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना भाषा गणित, विज्ञान, भूगोल या विषयांवर आधारित 50 ते 75 प्रश्न संख्या विचारली जाते. 100 ते 150 गुणांची परीक्षा ही घेतली जाते. नागभीड तालुक्यात या परीक्षेला आता विद्यार्थ्यांकडून आता चांगलाच प्रतिसाद मिळाला असून यंदा तब्बल ९० विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी दिली. यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप माहिती होते                                                                                                                                 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जीवनाभियोग शिक्षण देणारे पाहिले पाऊल म्हणून BTS ही परीक्षा घेण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशी बक्षिसे देण्यात येणार असून सध्याच्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप माहिती व्हावे याच उद्देशाने या परीक्षेचे आयोजन आपण करत आहोत नागभीड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.                                                                                                               करुणा सोनटक्के,                                                         तालुका समन्वयक, नागभीड

error: Content is protected !!