ब्रम्हपुरी : कला संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला परीक्षेत लोक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गांगलवाडी या विद्यालयातील एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून एलिमेंट्री परीक्षेत एकूण नव विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेत एकूण आठ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून विद्यालयाचा निकाल 97 टक्के लागलेला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक बुरडे व कला शिक्षिका शहारे यांचे मार्गदर्शनात परीक्षा दिली. व उत्तम श्रेणीमध्ये त्यांना यश सुद्धा मिळाले. या यशाबद्दल पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले जात आहे.


