नागभीड : आपुलकी फाउंडेशन नागभीड च्या वतीने भिकेश्वर येथे पंचायत समिती नागभीड व मांगली केंद्राचा बिट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 10 व 11 जानेवारी ला संपन्न झाला.
. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात नागभीड व मांगली केंद्रातील 22 शाळेतील 700 पेक्षा जास्त विद्यार्थी व 70 शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. दरम्यान आपुलकी फाउंडेशन नागभीड च्या वतीने विद्यार्थ्यांच्या अल्पहारची सोय करण्यात आली. यावेळी आपुलकी फाउंडेशन चे अध्यक्ष विजय बंडावार, संचालिका नंदा राखडे, माया सहारे, संचालक मधू डोईजड, महेश ठाकरे, नरेश ठाकरे, राजू ठाकरे, किशोर मुळे, पवन नागरे, स्वप्नील नवघडे, सचिन वाकुडकर, सतीश जिवतोडे, पराग भानारकर, मुकेश लांजेवार यांची उपस्थिती होती.
. आपुलकी फाउंडेशन च्या या उपक्रमाचे नागभीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे नागभीड केंद्राचे केंद्रप्रमुख प्रभाकर करंभे, मांगली केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान सातपुते, सर्व शिक्षक व भिकेश्वर वासिय गावकऱ्यांनी अभिनंदन केले.


