Home सामाजिक सर्वोदय महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’

सर्वोदय महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’

1170

सिंदेवाही : सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे नूकताच राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयीन ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

.     कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना ग्रंथालय आणि पुस्तकाचे महत्व पटवून दिले त्यांच्यात वाचनाबद्दलच्या आवड निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. तसेच ग्रंथपाल फुलबांदे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची माहिती देऊन, ग्रंथालयीन पुस्तके कशी हातडायची आणि ग्रंथालयीन पुस्तकाचे महत्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकाचे वाचन केले व पूस्तकातील लेखकाचे मनोगत इतर विध्यार्थ्यांना सांगितले.

.      या कार्यक्रमाला प्रा.डॉ मदारे प्रा. डॉ. त्रिपदे, प्रा. डॉ. राठोड प्रा नरेंद्र मेश्राम, प्रा. जयंतकुमार रामटेके, प्रा. रणदिवे, प्रा. गभने, प्रा.आडे, प्रा. सुभाष मेश्राम, प्रा.बोरकर, प्रा. तुमराम, प्रा. रामटेके, प्रा. पिसे, प्रा. अगळे, प्रा. बोरकर, प्रा. कोवे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बि.ए व बि एस सि चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिजवान यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अमित उके यांनी केले.

error: Content is protected !!