चंद्रपूर : अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’ फेकणाऱ्या खलिस्तानवाद्याला गुप्तचर यंत्रणेने चंद्रपूर येथून अटक केली. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. जसप्रीत सिंग (२०) असे या खलिस्तानवाद्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली
. जसप्रीत सिंग हा घुग्गुस नगर येथील लॉयड मेटल येथे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत तो तेथे राहत होता. गुप्तचर अधिकाऱ्यांनी गुरुवारी सुपरमार्केटमध्ये त्याच्या ओळखीची पुष्टी केली. शुक्रवारी झालेल्या गोळीबारानंतर नागपूर आणि चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांसह सहा सदस्यीय गुप्तचर पथकाने त्याला अटक केली. त्याचे वर पंजाबमध्ये इतर गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत,” असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले


