गुणवंत विद्यार्थी सत्कार
एक रुपयात विवाहाचे 29 वे वर्ष
भद्रावती : येथील ऐतिहासिक नगरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येथील ग्रामीण रुग्णालया जवळील माणिका देवी मंदिराच्या प्रांगणात 1 फेब्रुवारीपासून माना जमातीचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा गुणवंत विद्यार्थी सत्कार व एक रुपयात नाममात्र विवाह नोंदणी शुल्क घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भद्रावतीच्या नाग नगरीत स्वर्गीय व्यंकटेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाने आज 29 व्या वर्षात पदार्पण केले.
. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे व वधू-वरांचे सुयोग घडावे तसेच भविष्यात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी व्हावा या दृष्टीने गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. दि. 1 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी पाच वाजता पासून महिलां करिता विविध स्पर्धा यात हळदी कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम व रात्र भोजन तर दिनांक 2 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता ला वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, कार्यकर्ता गौरव पुरस्कार, हुंडा न घेणाऱ्या जोडप्यांचा जाहीर सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन व वधू-वर परिचय मेळावा तर दुपारी चार वाजता सामूहिक शुभविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
. बारावी विज्ञान शाखा, बारावी कला, बारावी वाणिज्य शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच बारावी सीबीएससी, दहावी शहरी विभाग ,दहावी ग्रामीण व दहावी सीबीएससी च्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी प्रथम 2000 रुपये व द्वितीय 1000 रुपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
. यावेळी माना जमातीच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. उपरोक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येनी माना जमातीच्या समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन माना जमात वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड, राजू जीवतोडे, शंकर गरमडे, विनायक गरमडे, एकनाथ रानडे, सुनील ननावरे, देवराव घरत, मनीष केदार, कालिदास सावसाकडे, रूपचंद धारने, दामोदर दोहतरे, देविदास जांभुळे, शामराव दांडेकर, जनार्दन वाकडे, बी. पी. हनवते आदींनी केले आहे.


