Home सामाजिक माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग, वरोरा येथे विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा 

माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग, वरोरा येथे विद्यार्थ्यांचा शपथ ग्रहण सोहळा

1431

वरोरा : येथील माता महाकाली कॉलेज ऑफ नर्सिंग (जी.एन.एम.) येथे दिनांक ०३ जानेवारी ला “जीएनएम” च्या दुसऱ्या बॅच चा शपथविधी सोहळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी  करण्यात आली.

.      सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन दि. साधनकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माता महाकाली तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रवीण बाभुळकर यांची उपस्थिती होती. सध्यस्थितीत वैद्यकीय सेवा, नर्सिंग सेवा काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा सर्वानी फायदा घ्यावा असे मनोगत अध्यक्ष सचिन दि. साधनकर यांनी व्यक्त केले.

.      या सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्रशासक पल्लवी अमृतकर, शाम पिंपळे यांच्यासह माता महाकाली गृप ऑफ इन्स्टिट्यूशन, वरोरा चा सर्व स्टाफ उपस्थित होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपाली मानकर, वृषाली चिकटे, साक्षी जगताप यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीएनएम द्वितीय वर्षाच्या आरती मेश्राम व पल्लवी सिडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन  प्रतीक्षा ढोंगळे यांनी केले.

error: Content is protected !!