नागभीड : संतांनी दिलेली शिकवण यामुळेच संस्कृती व संस्कार टिकुन असुन ग्रामगीतेच्या माध्यमातुन परीसर स्वच्छतेसोबतच शरीर व मनही स्वच्छ होत असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी नवेगाव हुंडेश्वरी येथील ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व ग्रामगीता प्रवचन महोत्सवात समारोपीय कार्यक्रमात बोलतांना केले.
. ग्रामगीता प्रवचनकार ह. भ. प. उदाराम बावणे महाराज यांच्या तेजस्वी वाणीतुन ६ ते १२ डिसेंबर पर्यंत या महोत्सवाचे आयोजन नवेगाव हुंडेश्वरी येथे करण्यात आले होते. या काळात संपूर्ण गावात दररोज सकाळी रामधुन काढली जात होती. यात विविध गावातून आलेल्या महिला भजन मंडळींची सहभाग लक्षणीय होता. गावातील सर्वच रस्त्यांची साफसफाई करुन प्रत्येकांच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. अशा या मंगलमय वातावरणात दररोज सामुदायिक प्रार्थना, ग्रामसफाई व ग्रामगीता प्रवचन केल्या जात होते.
. समारोपीय कार्यक्रमाला पंढरपूरचे नत्थुजी भुते, कृउबास संचालक धनराज ढोक, नवेगाव हुंडेश्वरी च्या सरपंच कलुबाई नेवारे, पोलीस पाटील शारदा चौधरी, ग्रा.पं. सदस्य सतीश गायकवाड, कोर्धा चे उपसरपंच दिनेश चौधरी, शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे, कोसंबी गवळी चे माजी सरपंच मच्छिंद्र चन्नोडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. ग्रामगीता पुजन व श्रध्दांजलीवर आधारीत भजनानंतर मौन श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर या महोत्सवाची सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, नवेगाव हुंडेश्वरीच्या कैलास सोनुले, धनंजय चौधरी, दिनकर नेवारे, सुखरु गेडाम, संजय पांडव यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.


