विसापूर : येथील तेली समाजाच्या वतीने पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालय मध्ये रविवारी श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त समाज बांधवांनी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. यामध्ये घटस्थापना, उदघाटन समारंभ, संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे.
. घटस्थापना माजी सरपंच बंडू गिरडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी सैनिक रामदास हरणे सहकार्य करतील. त्या नंतर संत जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे उदघाटन कविता गिरडकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी वरघणे,रविना ठाकरे, मोनिका शेंडे, अनिता कुहिटे,मनिषा ढेंगरे,सुरेखा इटनकर, सविता इटनकर यांची उपस्थिती राहणार आहे.
. तदनंतर समाज बांधवाची संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र इटनकर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर चे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक दिनेश वरघणे, दिनकर गिरडकर, अक्षय देशमुख, नंदकिशोर गिरडकर, संतोष वैरागडे यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाला सहकार्य करावे, असी विनंती समाज बांधवांनी केली आहे.


