Home सामाजिक आसाळा येथे पशुरोग निदान व लसीकरण शिबिर

आसाळा येथे पशुरोग निदान व लसीकरण शिबिर

1254

वरोरा : तालुक्यातील आसाळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना खेमजई, एम श्री एम फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 नोव्हेंबर ला पशुरोग निदान व लसीकरण शिबिर घेण्यात आले.

.        शिबिराचे उद्घाटन सरपंचांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सतीश अगडते, एम श्री एम प्रकल्पाचे समन्वयक अनिल पेंदाम इत्यादी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये जनावरांचे रोगनिदान, 298 जनावराचे लसीकरण, गर्भधारण तपासणी, वंधत्व निवारन व तपासणी करण्यात आली. पशुधारकांना साथीचे रोग, एफ. एम.डी. लसीकरणाचे फायदे लसीकरणाचे फायदे व पशु आरोग्यावर सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर सतीश अगडते यांनी केले. या परिसरातील दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी अनिल परिणाम यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

.      शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रमोद गायकवाड, गोपाल राठोड, वैभव चौधरी, युगांत चौधरी, मनीष चौधरी इत्यादींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!