वरोरा : वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्रातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार करण संजय देवतळे यांचे निवासस्थानी धनगर जमात संघटना वरोरा तालुका यांचे कडून नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांना भंडारा
लावून ‘यळकोट यळकोट… जय मल्हार’ च्या घोषणा देत पिवळा दुपट्टा व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
. या प्रसंगी गजानन शेळके यांनी जमात बांधवा तर्फे अभिनंदन व पुढील वाटचालिस शुभेच्छापर थोडक्यात विचार व्यक्त केले.
. अभिनंदन करण्यासाठी शहरी व ग्रामिण भागातून दिलिप तुराळे, दिनकर घोरूडे, शिरीष उगे, उमेश खानेकर, निर सर, पंढरी बारतीने, रवि गावंडे, श्रीहरी आस्कर, महेश बोधे, रामकृष्ण खानेकर तथा ग्रामिण भागातून अनिल बरडे, राहूल तुराळे, शेखर झिले, रोशन तुराळे, सुनिल बरडे, चरणदास तुराळे, प्रशांत बरडे, रूपेश तुराळे, आशिष तुराळे तरूण समाज बांधव उपस्थित होते.


