ब्रम्हपुरी : लोक विद्यालय गांगलवाडी येथे संविधान दिन भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदर भाव व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक बुरडे यांनी उपस्थितांना संविधान वाचन करून दाखवले आणि संविधान दिनाच्या महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय, त्याचा इतिहास, आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीस मिळालेल्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल मार्गदर्शन केले.
. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्ताने त्यांच्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून दिली आणि भारतीय संविधानाच्या महत्त्वाबद्दल सखोल चर्चा घडवून आणली.


