Home सामाजिक पथनाट्यच्या सादरीकरणातून मतदान जनजागृती

पथनाट्यच्या सादरीकरणातून मतदान जनजागृती

1296

वरोरा : शहरातील मुख्य चौकामध्ये स्विप कार्यक्रमांतर्गत वरोरा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृती करिता वरोरा बस स्थानक जवळ व नेहरू चौक येथे जनजागृती कार्यक्रम करण्यासाठी नोडल ऑफिसर ज्ञानेश्वर चहारे वरोरा विधानसभा तथा गटशिक्षणाधिकारी वरोरा यांनी पुढाकार घेत शहरातील चौका चौकामधील नागरिकात मतदान जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदारांनी शंभर टक्के मतदान करून टक्केवारी वाढवावी यासाठी वरोरा शहरातील चौका चौकामध्ये घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारातून आपला हक्काचा राजा निवडला पाहीजे राजा पोटातून नाहीतर आता राजा बोटातून मतदान करुन निवडला पाहिजे.

.      मतदान वाया घालवू नका मतदानाची टक्केवारी वाढवा. अशा आशयाचे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनाच्या शैलीतून अनेक उदाहरणं देऊन आमजन बहुउद्देशीय संस्था यांच्या अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच, वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे कलापथकांतील कलाकार पथकप्रमुख विलास चौधरी, निखिल राणे, सुनील कापटे, सुनील ननावरे, सुरज राजनहिरे, प्रदीप चौधरी, मीनाक्षी गुडदे व परि नन्नावरे चौका चौकात पथनाट्य राबवून मतदान जनजागृतीची मोहीम हाती घेत मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे.

.      बसस्थानक वरोरा येथील पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमा दरम्यान नोडल अधिकारी ज्ञानेश्वर चहारे यांनी मार्गदर्शन करत लोकांना मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले. याप्रसंगी निवडणूक कर्मचारी प्रमोद तुराणकर, अजय मुडपल्लीवार, राहुल खरवडे, नितीन शास्ञकार, सुभाष ढगे, वसंत राखुंडे हे सुद्धा उपस्थित होते.

error: Content is protected !!