राजुरा : स्विप कार्यक्रमांतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृती करिता राजुरा बस स्थानक जवळ व गांधी चौक येथे जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.
. गटशिक्षणाधिकारी नोडल ऑफिसर मनोज गौरकार यांच्या पुढाकारातून शहरातील चौका चौकामधील नागरिकात मतदान जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदारांनी शंभर टक्के मतदान करून टक्केवारी वाढवावी यासाठी घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारातून आपला हक्काचा राजा निवडला पाहीजे, राजा पोटातून नाहीतर आता राजा बोटातून मतदान करुन निवडला पाहिजे. मतदान वाया घालवू नका मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान केले.
. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनाच्या शैलीतून अनेक उदाहरणं देऊन आमजन बहुउद्देशीय संस्था, विसापूर यांचे कलापथकांतील कलाकार पथकप्रमुख विलास चौधरी, निखिल राणे,सुनील कापटे,सुनील ननावरे, सुरज राजनहिरे,प्रदीप चौधरी, मीनाक्षी गुडदे व परि नन्नावरे चौका चौकात पथनाट्य राबवून मतदान जनजागृतीची मोहीम हाती घेत मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. बसस्थानक राजुरा येथील पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमा दरम्यान नोडल अधिकारी मनोज गौरकार यांनी मार्गदर्शन करत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.


