ब्रह्मपुरी : दि रुरल एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी द्वारा संचालित, लोक विद्यालय गांगलवाडी येथे गुरुवार दि. 14 नोव्हेंबर ला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती “बालक दिन” म्हणून साजरी करण्यात आली.
. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयातील रामटेके, जुमनाके, दोनाडकर, नरुले, शहारे, पत्रे, तिजारे, गजबे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून रामटेके यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे बालकांप्रतीचे प्रेम चाचा पर्यंत कसे गेले यावर मार्गदर्शन केले तर अध्यक्ष मनोगतात एम .पी राऊत यांनी पंडित नेहरूंच्या जीवनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीची विद्यार्थिनी मानसी ठलाल यांनी तर आभार तृप्ती खोबरे यांनी मानले.


