अखेर सिंदेवाही – रामाळा – वासेरा -मार्ग सुरू

7

सिंदेवाही : सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही अंतर्गत रामाळा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पुल तोडण्यात आला आणि तात्पुरता रपटा तयार करून वळण मार्ग करून देण्यात आला. मात्र जून महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे रपटा वाहून गेला. त्यामुळे मागील जून महिन्यापासून सिंदेवाही – रामाळा – वासेरा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र जास्त अंतर असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड आणि वेळ वाया घालवावा लागत होता. त्यामुळे परिसरातील नागरिक संबंधित कंत्राटदार यांना भेटून रपटा तयार करून देण्याची मागणी केली होती. नदीच्या पात्राचे पाणी कमी होताच कंत्राटदार यांनी रपटा तयार करून मंगळवार पासून मार्ग सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

.      सिंदेवाही पासून ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रामाळा गावाजवळील बोकडडोह नदीवरील जुना पुल क्षतिग्रस्त झाला होता. त्यामुळे तो पुल तोडण्यात आला. आणि त्याठिकाणी नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. नेहमीच्या मार्गाचा पुल तोडण्यात आला. आणि त्याचे बाजूने वळण मार्ग तयार करून नदीवर रपटा बनविण्यात आला. मात्र पावसाच्या पहिल्याच पावसात रपटा वाहून गेला असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आवाहन करून वळण मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली.

.      मात्र नेहमी पेक्षा जास्त अंतर पडत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. नदीच्या पात्राचे पाणी कमी होताच परिसरातील नागरिकांनी संबंधित कंत्राटदार यांना रपटा तयार करून देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला लक्षात घेऊन संबंधित कंत्राटदार यांनी तत्काळ नदीवर रपटा तयार करण्यात आला असून मंगळवार पासून दुचाकी, आणि चारचाकी वाहन जाण्यासाठी मार्ग सुरू करून देण्यात आला. तसेच लवकरच मुरूम, गिट्टी, टाकून जड वाहतूक सुरू करण्यात येईल. असे संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग मार्फत कळविण्यात आले आहे.