भद्रावती : तालुक्यातील उपबाजार आवार, नंदोरी येथील मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज, खंडाळा (रिठ), टाकळी – नंदोरी येथे शनिवार दि. 26 आक्टोंबर रोजी बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते शेतमाल खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 363 क्वि. सोयाबीन व 101 क्वि. कापसाची खरेदी करण्यात आली.
. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती अश्लेषा मं. भोयर (जिवतोडे) व संचालक गजानन उताणे, मनोहर आगलावे, कान्होबा तिखट, प्रविण बांदुरकर, राजेंद्र डोंगे, तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह व्यापारी मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज चे संचालक अविश बाहे, नंदोरी ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आलेले शेतकरी सुरेश काळे कोंढा, शत्रुघ्न पिदुरकर टाकळी, रविंद्र विधाते ताडाळी, संदिप ढेंगळे टाकळी, मंगेश विरूटकर नंदोरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, प्रविण राहुलगडे, विलास पालकर, तसेच मापारी अरूण पाठक यांनी सहकार्य केले.
शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला कापूस, सोयाबीन, तुरी, चना इत्यादी शेतमाल भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार, नंदोरी येथील मे. अदिती कॉटन इंडस्ट्रिज, खंडाळा (रिठ), टाकळी, नंदोरी येथे विक्रीस आणावा, असे संयुक्त आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ल. ताजणे, उपसभापती अश्लेषा मं. भोयर (जिवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर यांनी केले आहे.


