अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला कठोर शिक्षा होणारचं – चित्रा वाघ

397

पीडित कुटुंबाची घेतली भेट

कोरपना : शिक्षक ज्याला आपण आई-वडीनंतर गुरु मानतो. त्या गुरुनेच चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अत्याचार केला. अनेकांनी तक्रार देण्यास दबाव टाकला परंतू तिने दबावाला न घाबरता समोर येवून तक्रार दाखल केली. त्या नराधम शिक्षकाने इतरही मुलीचे शोषण केल्याची माहिती आहे ती लवकरच पुढे येईल. महिलांनी न घाबरता पुढे यावे सरकार आपल्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील कोरपना अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आज आल्या होत्या. भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

.       यावेळी त्यांनी, या प्रकरणात एकही शब्द न बोलणाऱ्या विरोधी पक्षातील महिला नेत्यांवर टीका केली. बारामती, सोलापूर, अमरावती, मुंबईच्या काँग्रेसच्या ताई याप्रकरणी बोलल्या नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे त्या म्हणाल्या. विजय वडेट्टीवार, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे केवळ राजकारण करणारी ही मंडळी आहे आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर आलाय, असे वाघ म्हणाल्या. यावेळी राहुल गांधी यांच्यावर वाघ यांनी निशाणा साधला. मोहब्बत की दुकानात काय चाललंय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

.       आरोपी काँग्रेसचा पदाधिकारी होता. त्याचे नियुक्ती पत्र खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिले. धानोरकर या एक महिला आहेत. मात्र या घटनेवर त्यांनी एक चक्कार शब्द बोललेला नाही. याचं मला आश्चर्य वाटतं. वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयाची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी घडलेला प्रकार सविस्तर जाणून घेतला. तसेच त्यांना या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्यासोबत भावनिकरित्या धीर सुद्धा दिला. याप्रसंगी राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, अल्का आत्राम आदी उपस्थित होते.