चिकणी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न
वरोरा : चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत डाॅ. चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतुन वरोरा तालुक्यातील चिकणी येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजार बारा नागरीकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
. वरोरा भद्रावती तालुक्यात चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत डोळे तपासणी, आरोग्य तपासनी, मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन, प्रेरणेतुन प्रगति, असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत
चिकणी येथे पार पडलेल्या शिबीरात चिकणी, बोपापूर, खापरी, टाकळी, डोंगरगाव, शेगाव, खरवड, गौळ, नागरी, केळी, महाडोळी, वाघनख, या गावातील १०१२ नागरीकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला व डोळे तपासणी करुन घेतली.
. या कार्यक्रमाचे उदघाटन सुरेश माथनकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. चेतन खुटेमाटे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जर्नादन देठे, किशोर झाडे, संगिता खारकर, आनंदराव दातारकर, पंढरी बुचूंडे, नरेंद्र माथनकर, पंढरी देहारकर, सुनिल येळेकर, नथ्थुजी गावंडे, मेघश्याम बोधे, रामभाऊ येडेकर, खिरटकर महाराज, गजानन येळेकर, सुरेश साळवे, प्रणिल खंगार उपस्थित होते.
. प्रास्ताविक सुधाकर खरवडे, संचालन चंद्रशेखर झाडे, तर आभार प्रदर्शन संदिप सोनेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदृष्टी नेत्रालय ची सर्व टिम प्रविन वासेकर, विजय झाडे, विठ्ठल भेदुरकर, मारोती जवादे, विलास घाईत, ताराचंद बोरेकर, मारोती कुत्तरमारे, सुनिल डोंगरे, रंजना भुसारी, अनुप खुटेमाटे, सचिन खुटेमाटे, महेश आस्कर यांनी अथक प्रयत्न केले.