चंद्रपुरात धर्मवीर २ चित्रपट पाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी

405

चंद्रपुर : धर्मवीर आनंद दिघे यांच्या व त्यांच्या हिंदुत्वाची ललकार ऐकण्यासाठी चंद्रपूरतील शिवसैनिकांनी धर्मवीर 2 चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

.         चंद्रपुरात महानगर प्रमुख भरत गुप्ता यांनी सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन धर्मवीर २ चित्रपट बघितला. ढोल वाजवत पटाक्याची आतिषबाजी करत सर्वांनी मिळून पिक्चर बघितला. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय असो, हिंदू धर्मा विषयी असो की महिलावर होणार अत्याचार असो या सर्व विषयांवर दिघे साहेबानी मार्ग काढला आणि आता त्यांच्या पाउलावर पाउल टाकत शिंदे साहेबानी धुरा सांभाळली आहे, चित्रपट पाहण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, वैद्यकीय मदद कक्ष जिल्हा प्रमुळं अविनाश उईके, शहर प्रमुख वाणी सदालावार, उपशहर प्रमुख मंदा करहाले, नयन जंगम, आदित्य यादव, पारस बिल्लोरे, तेजस गाणार, आदित्य निषाद, सूचक दखणे, शैलेश सदालावार, वर्षां चुनरकर, रविना, प्रभाकर आसलवर व कार्यकर्ते उपस्थित होते.