वृद्धाने केली अल्पवयीन मुलींकडे लैंगिक सुखाची मागणी

15

बल्लारपूर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींना दाखविले पैशाचे आमिष

विसापूर : बल्लारपूर शहरातील एका ७२ वर्षांच्या घरी एक कुटुंब भाड्याने राहते. त्या घरी दोन अल्पवयीन मुली देखील वास्तव्य करतात. त्या अल्पवयीन मुलींना वृद्धाने पैशाचे आमिष दाखविले. पैशाच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली. पिडीत मुलींनी याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात त्या वृद्ध व्यक्ती विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. ही घटना रविवार ( दि.१५ ) सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून समाजमन सुन्न झाले आहे.

.       बल्लारपूर येथील रविंद्र नगर वार्डात एका ठिकाणी त्या ७२ वर्षांच्या वृद्धाचे घर आहे. त्याच्या घरी एक कुटुंब भाड्याने राहते. भाड्याच्या घरात त्या कुटुंबातील १७ व १५ वर्षाच्या मुली घरी होत्या. घर मालक वृद्धाची वाईट नजर त्या मुलीवर होती. त्या वृद्धाच्या मनात वासना जागृत झाली. आपली वासना शमविण्यासाठी त्याने पिडीत मुलींना पैशाचे आमिष दाखविले. एकीला दोनशे रुपये व दुसरीला पाचशे रूपये देण्याच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली.

.       या घृणास्पद प्रकाराने मुली घाबरल्या.पिडीत मुलींनी पोलीस ठाणे गाठले. ७२ वर्षाचा वृद्ध घर मालक आम्हाला पैशाच्या बदल्यात शरिर सुखाची मागणी करीत असल्याची बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिडीत मुलींच्या तक्रारीवरुन त्या वृद्ध व्यक्ती विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(१),७५ (१) (२),७५(२),332 (क) च्या सहकलम ८,१२ लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मिनल कापगते करीत आहे.