चिंतामणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली लोकशाही

472

मतदानातून निवडले वर्ग प्रतिनिधी 

निवडून आलेल्या प्रतिनिधींची काढली मिरवणूक

विसापूर : लोकशाही प्रक्रियेत मतदानाला विषेश महत्व आहे. याचे महत्व विद्यार्थ्यांना अवगत व्हावे. आपण आपले प्रतिनिधी मतदानातून कसे निवडून देतो. याची प्रत्येक्ष माहिती जाणून घेण्यासाठी चिंतामणी माध्यमिक विद्यालयात पडताळणी केली. विद्यार्थ्यांनी आपले प्रतिनिधी मतदानातून निवडले. बलेट पेपरच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदानाने वर्ग प्रतिनिधी निवडून दिले. निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधींची वाजतगाजत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.

.       चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये लोकशाही प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मतदानातून शाळा नायक, उपनायक, क्रीडा प्रमुख आणि सांस्कृतिक प्रमुख पदी मतदानातून निवडले. यामध्ये शाळा नायक म्हणून वैष्णवी पंधरे, उप नायक पदी अलिशा शेख, क्रीडा प्रमुख म्हणून आयुष वैरागडे आणि सांस्कृतिक प्रमुख म्हणून नव्या पोटे या विद्यार्थ्यांनी निवडणुकीत बाजी मारली.

.       यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य प्रशांत दोंतुलवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अरूण टोंगे, चंद्रकांत पावडे, विणा चांदेकर, संगीता उमरे, ललिता टोंगे (पोडे), विजय सातपुते, शुभांगी बरडे, कृशागौतमी खोब्रागडे, संतोषी तगलपल्लिवार, सोनाली आत्राम, श्रद्धा साखरकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. सहकार्य मुन्नालाल पुंडे, विकास कल्लुरवार, सुभाष भटवलकर, रविंद्र कोडापे, विलास देठे आदिंनी केले.