Home शैक्षणिक किसान विद्यालयाची देवश्री टापरे एनएमएमएस शिष्यवृत्ती साठी पात्र

किसान विद्यालयाची देवश्री टापरे एनएमएमएस शिष्यवृत्ती साठी पात्र

1244

वरोरा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये वरोरा तालुक्यातील डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळ डोंगरगाव द्वारा संचलित किसान विद्यालयाची देवश्री किशोर टापरे ही विद्यार्थी एन एम एम एस या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.

.       एन एम एम एस हे शिष्यवृत्तीची परीक्षा 22 डिसेंबर 2024 ला घेण्यात आली होती यामध्ये किसान विद्यालयाचे 25 विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी देवश्री किशोर टापरे ही आठवीची विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली असून तिला बारावीपर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. याबद्दल डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास माथनकर, उपाध्यक्ष श्रीधर काळे सचिव सुभाष माथनकर तसेच मुख्याध्यापक हेमंत कावटी तसेच मार्गदर्शक शिक्षक मनोहर चव्हाण, अनुप माथनकर, अर्चना बरडे व सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!