विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

16

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विठाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जटपूरा गेट तसेच बनकर लेआउट, लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट समोर नगीनाबाग वार्ड नंबर-1 येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.

.        निसर्गाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.वृक्षसंवर्धनही महत्त्वाचे कारण झाडे जगली तरच शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक आहे. यासाठी एक पाऊल म्हणून विठाई बहुउद्देशीय संस्थेने सुद्धा सहभाग दर्शवलेला. यावेळी वड, पिंपळ, गुलमोहर, चिकू, आंबा, अशा अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली. फक्त झाडे लावण्याचाच नाही तर वृक्षांची संवर्धन करण्याचे सुद्धा प्रत्येक सदस्यांनी याप्रसंगी दृढनिश्चय केलेला आहे.

.        याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, चेतन जनबंधु, परवेज शेख, दिनेश जुमडे, ओमप्रकाश मिसार, भारती कश्यप, कीर्ती नगराळे, सुषमा मोकळे, प्रीतम रागीट, सुषमा घटे, माधुरी काहिलकर, अर्चना मिसार, शिवानी घटे, सोनू नगराळे इत्यादी सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.