जिल्हास्तरीय  मैदानी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

20

चंद्रपूर :  केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता सन 2024-25 या वर्षात खेळाडू निवड चाचणीचे आयोजन 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले आहे

.        याकरीता 14 वर्ष आतील मुले/मुली व 16 वर्षाआतील मुले/मुली करीता 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 निवड चाचणी होणार आहे. यात उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वत:च्या पूर्ण तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधार कार्ड व जन्मदाखला प्रत सोबत आणावे आणि किमान प्रशिक्षणार्थ्यांचा जन्म 12 डिसेंबर 2013 नंतरचा असावा.

.        उपरोक्त निवड चाचणीकरिता ‍जिल्ह्यातील जास्तीत जास्त  खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सींग) विजय डोबाळे (मो.क्र. 9545858975) व खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो. क्र. 7798174435 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड चंद्रपूर यांनी कळविले आहे.