प्रेमात धोका 💔 प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

110
  • आनंदवन येथील घटना 
  •  आरोपीला ६ दिवसाची पोलीस कोठडी 

वरोरा

..                    सहा महिन्यापासून प्रेम प्रकरण सुरू असताना प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध जुळले. हे माहीत होताच आपल्याला धोका दिला म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसी च्या घरी जाऊन तिच्या गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची घटना २६ जुन ला घडली. २४ तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता (दि. ४ ) ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

.                . प्राप्त माहितीनुसार आरोपी समाधान माळी हा जळगाव जिल्ह्यातील असुन तो सेवाग्राम मध्ये स्वतःवर उपचार करण्यासाठी यायचा तर मृतक आरती ही आपल्या आई वडिलांसोबत सेवाग्राम मध्ये जायची या दरम्यान आरोपी समाधान व आरती चे प्रेम प्रकरणाचे सूत जुळले. विशेष म्हणजे आरतीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते मात्र ती दिवाळी पासून आनंदवनात आपल्या आई वडिलांकडे राहायची. समाधान ला कुष्ठरोग असल्याने तो उपचारासाठी आनंदवनात दाखल झाला. तिथे उपचार घेत असताना तो केअर टेकरचे कामही करायचा. आनंदवनात राहू लागल्याने दोघाचे प्रेम चांगलेच बहरू लागले. मात्र अचानक आरतीचे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. याची चाहूल समाधानला लागली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले, समाधान आरतीला म्हणाला की जर तुला माझ्या प्रेमाची गंमत करायची होती तर प्रेमात आणाभाका कशाला घ्यायला लावल्या, यावरून दोघांचे वाद सुरु झाले. आरोपी समाधान ने आरतीचे आई वडील सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याची संधी साधतं तिला तिच्या घरी भेटायला गेला. काही वेळ आरती सोबत गप्पा केल्या. आरती बाथरूम ला गेली आणि तिच्या पाठोपाठ समाधान गेला आणि बाथरूम मध्येच तिचे लक्ष नसताना आरतीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.  आरोपी समाधान याने हत्या करून नागपूर येथील अशोकवन येथे गेला मात्र पुन्हा तो परत येत असताना खांबाळा गावाजवळ वरोरा पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी आरोपी समाधान ला वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

..              सदरची यशस्वी कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.