Home पोलीस डायरी स्वतःच्या पिकअपला बांधलेल्या दोरांना दोरी लावून युवकाचा गळफास 

स्वतःच्या पिकअपला बांधलेल्या दोरांना दोरी लावून युवकाचा गळफास

1421

नेरी येथील घटना

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

नेरी : नेरी-जांभूळघाट मार्गावरील रस्त्याच्या बाजूला घरासमोरील उभ्या असलेल्या स्वतःच्या पिकअप वाहनाला  बांधलेल्या दोरांना दोरी लावून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिमूर तालुक्यातील नेरी येथे ५ जून ला सकाळीस उघडकीस आली. रमेश भाऊराव पिसे (37) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

.            प्राप्त माहिती नुसार नेरी येथील मृतक रमेश भाऊराव पिसे हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूच्या  चौकात राहत होता. दिनाक 4 जून च्या पहाटे 2 वाजताच्या सुमारास स्वतच्या पिकअप गाडीला दोर बांधून गळफास घेतला. ही घटना सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना सकाळी 4 चे सुमारास लक्षात आली. गळफास लागलेला इसम दिसताच त्याला बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. व याची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. पोलिस विभागाने तत्काळ घटनास्थळ गाठत सकाळी 7.30 चे सुमारास सदर शव उतरवून उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुलदस्त्यात आहे. पुढील तपास चिमुर  पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!