माजरी : अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंती शुक्रवारी माजरीत दिवसभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. अक्षय तृतीया व परशुराम जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजता गायत्री माता शक्तिपीठ माजरी येथे भगवान परशुराम यांच्या प्रतिमापूजन आणि हवन कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर ब्राम्हण समाजाच्या वतीने आंबेडकर चौकात सकाळी ११ वाजतापासून सांयकाळी ६ वाजेपर्यंत शरबत वाटप करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आले.
. शुक्रवारी माजरीत आठवडी बाजार असल्यामुळे माजरीसह परिसरातील हजारो नागरिकांनी शरबतचा आस्वाद घेतला. ब्राम्हण समाजाचं शरबत वाटप कार्यक्रम माजरी परिसरात आदर्शवत ठरावे असे कौतुक उदगार यावेळी अनेक नागरिकांनी काढले.
. दरम्यान गायत्री माता मंदिरात सांयकाळी ५ वाजतापासून सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले. सुंदरकांडच्या कार्यक्रमानंतर आरती करण्यात आली. शेवटी प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात आले.
. यावेळी ब्राम्हण समाज शाखा माजरीचे अध्यक्ष रामदुलारे पांडे, कार्याध्यक्ष संजय तिवारी, उपाध्यक्ष डॉ. विनयकुमार मिश्रा, सचिव रामप्रकाश पांडे, कोषाध्यक्ष दिवाकर पांडे, मार्गदर्शक परमानंद चौबे, चंद्रमा तिवारी, प्रेमनाथ मिश्रा, मिहीर झा, मोहन दुबे, राजू मिश्रा यांच्यासह युवासंघटनेचे अध्यक्ष सुबोध तिवारी, कार्याध्यक्ष विकास तिवारी, उपाध्यक्ष अनुप पांडे, सचिव रौनक पांडे, सहसचिव रवि तिवारी आदींची उपस्थिती होती.


