Home पोलीस डायरी घरमालकाची मुलगी आणि जावईच निघाला चोर

घरमालकाची मुलगी आणि जावईच निघाला चोर

1333

१५ तोडे सोने चोरी प्रकरण

भद्रावती : पाच दिवसांपूर्वी भद्रावती शहरातील गोविंद लेआउट येथे भाड्याने राहणाऱ्या माशिरकर यांच्या घरातून १५ तोळे सोने व सात हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याची घटना ५ दिवसापूर्वी घडली होती. घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा असतानाही आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत नसल्याने संशयित आरोपी म्हणून घर मालकाच्या मुलीला ताब्यात घेत पोलीस हिसका दाखवतात चोरीची कबुली दिली. घरमालकाचीच पोरगी व जावई चोर निघाल्याचे तपासात उघडकीस झाले प्रकरणात घरमालकाची मुलगी व जावईच चोर निघा वैशाली कारेकर (२८) व सतीश कारेकर (३८) रा. भद्रावती अशी आरोपींची नावे आहेत.

.        शहरातील गोविंद लेआउटमध्ये मंदा वरखडे यांच्या घरी फिर्यादी महेश माशीरकर हे भाड्याने राहतात. काही दिवसांपूर्वी माशिरकर यांचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. त्या दिवशी फिर्यादीला वेळेवर काम आल्याने घरातील दरवाजाला कुलूप न लावता ते बाहेर गेले. ही संधी साधून घरमालकाची मुलगी आरोपी वैशाली कारेकर आणि जावई सतीश कारेकर या दोघांनी घरात प्रवेश करून कपाटातून १५ तोळे सोने व रोख रक्कम ७ हजार लंपास केले. दरम्यान, काही वेळाने माशिरकर घरी आल्यानंतर कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी ५ मे रोजी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. ठाणेदार बिपिन इंगळे यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. मात्र, घटनेच्या वेळी बाहेरील कोणी व्यक्ती घरात प्रवेश करताना किंवा जाताना दिसले नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय घरमालकाच्याच मुलीकडे वळला. आरोपी वैशालीला पोलिसी हिसका दाखवताच तिने चोरीची कबुली दिली.

.        पोलिसांनी तिला अटक करीत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी जावई सतीश हा फरार झाल्याने ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक वीरेंद्र केदार, गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, निकेश ढंगे, विश्वनाथ चुधरी, जगदीश जाडे आदींचे पथक कसून शोध घेत आहे.

error: Content is protected !!