पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चंद्रपुरात

41
  • सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा 

चंद्रपूर:

.            चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. भाजपा गड असलेल्या या लोकसभा क्षेत्रात २०१९ मध्ये भाजपचे दिग्गज हंसराज अहीर यांचा काँग्रेस चे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांची थेट भाजप चे अभ्यासु व्यक्तिमत्व सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लढत राहणार आहे. मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवारी चंद्रपुरात सभा होणार आहे. ही सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी विजयश्री राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.

.                    २०१४ च्या लोकसभेचे भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेस कडून संजय देवतळे हे उमेदवार होते. देवतळे यांची जमेची बाजू असताना चंद्रपुरात झालेल्या मोदींच्या सभेनंतर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे वातावरणा बदलले गेले होते. यात ३२४९५ मतांनी हंसराज अहीर विजयी झाले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहीर यांना काँग्रेस चे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी पराभुत केले . चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात धनोजे कुणबी समाज मोठा प्रमाणात असल्याने बाळू धानोरकर यांना २०१९ च्या निवडणुकीत धनोजे लॉबी चालल्याने मोठा फायदा झाल्याचे बोलल्या जात होते. आता काँग्रेस कडून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या सुद्धा पाठीमागे धनोजे कुणबी समाज राहणार काय हे मतदार ठरविणारच आहे. तर आपल्या भाषणाच्या शैलीत जात, धर्म, रंग,वर्ण उंची सर्व सारखे असल्याचे मानणारा, अभ्यासु नेता सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने मैदानात उतरविले आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी आज सोमवारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मुनगंटीवारांसाठी ही सभा फार महत्वाची राहणार आहे.

“मोदी है तो नामुमकीन नही “अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मोदीच्या सभेनंतर चंद्रपूर लोकसभेचे चित्र बदलणार हे मात्र खरे