सरडपार येथे सात्त्विक होळीचे आयोजन

44

नेरी : नेरी या गावापासून 2 किमी अंतरावर असलेल्या सरडपार या गावात श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने दर वर्षी होळी या सणानिमित्त धुलीवंदन या दिवसाला सात्त्विक होळी चा कार्यक्रम साजरा करण्यात येतो याही वर्षी मोठया उत्साहात दि 25 मार्चला गुरुदेव भक्तांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

.        सात्विक होळी हा कार्यक्रम तालुक्यात होणारा पहिलाच गाव आहे, की जिथे सात्त्विक होळी हा कार्यक्रम होत असते. कार्यक्रमाचे प्रसंगी या कार्यक्रमाचे औचित्य म्हणून गावांमध्ये ग्रामसफाई करून घरासमोर रांगोळ्या टाकून संतांचे फोटो लावून गावातून पालखीचं रामधून च्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यात महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी यात भजन करीत गावाच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून रामधून काढण्यात आली, आणि त्यानंतर या सर्व कार्यक्रमाचा समारोप श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे मान्यवरांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले.

.       यावेळी सुधाकर पिसे प्रचारक नेरी, घनश्याम चापले तालुका प्रचारक प्रमुख, विलास पिसे उपासक गुरुदेव सेवा मंडळ नेरी रवींद्र चुटे उपासक सूर्यवंशी, ह.भ. प.चरणदास पोईंनकर महाराज आनंदराव कडूकार, टिकारामजी वाघमारे, वामन बोरकर, प्रा. मनोहर गुळधे, आणि कमल गुळधे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने या मान्यवरांनी महाराजांचा प्रचार कसा असायला हवा आपल्या मुलावर संस्कार कसे असायला हवे, या सात्त्विक होळी निमित्त आपण आपल्यातला अहंकार द्वेष मस्तसर , अज्ञान, ज्या आपल्या मनातील अंधश्रद्धा आहेत हे सर्व विकार आपण या सात्त्विक होळी निमित्त जाळून टाकले पाहिजे. आपले जीवन हे सात्विक असायला हवे असे या प्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडले.

.      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद देवतळे यांनी केले तर या सर्व कार्यक्रमाचे संचालन गजानन ठाकरे यांनी केले या कार्यक्रमाकरिता तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार पदाधिकारी आणि गावातील असंख्य गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.