धर्मराज कन्या विद्यालयात जागतिक वन दिन साजरा

19

नागभीड : नागभीड तालुक्याती धर्मराज कन्या विद्यालय नवेगाव पांडव येथे जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभाग नागभीड चे वनपरीक्षेत्राधिकारी आकाश सोंडवले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणन कुंदोजवार, ठाकूर, मडावी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चावरे ह्या होत्या.

.      यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . त्याचप्रमाणे निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या संचालन तिलोत्तमा खोकले या विद्यार्थिनीने केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय हरित सेना प्रमुख पांडव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार तनिषा शेंडे या विद्यार्थिनी केले.