गुन्हेगारी प्रवृतीवर आळा घालु : एस. एस. भगत

21

पत्रकारांची औपचारीक चर्चा

मुल : इतरांना त्रास होईल असा पध्दतीने सुसाट वेगाने वाहन चालविणार्‍या युवकांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे, बस स्थानकावर विनाकामाने टवाळक्या करणार्‍यावर कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालु असे मत मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. भगत यांनी पत्रकारांच्या औपचारीक चर्चेदरम्यान व्यक्त केले.

.     अमरावती जिल्हयात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर एस. एस. भगत यांची मूल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन बदली झाली. ते 18 मार्च पासुन मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणुन कामकाज बघत आहेत. मूलच्या पत्रकारांनी त्यांचे स्वागत केले असता त्यांनी पत्रकारांशी मनमोकळया गप्पा मारल्या. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली, दरम्यान होवु घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, आचारसहितेंचे नागरीकांकडुन काटेकोरपणेपालन होण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडुन प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगीतले, यासोबतच अवैध दारूविक्री, वाहतुक, जनावरांची अवैध तस्करी, सुगंधीत तंबाखु विक्रीवर आळा घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

31 वर्षे पोलीस प्रशासनामध्ये कामकाम करीत असताना जवळपास दिडशे खुनाच्या गुन्हाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. भगत यांनी केलेला आहे.  बहुतांष गुन्हे हे मनभेद, मतभेदामुळेच होत असतात, त्यामुळे शब्दावर नियंत्रण ठेवले पाहिजे, जो शब्दावर नियंत्रण ठेवतो तो शिखर गाठु शकतो असा सल्लाही त्यांनी यानिमीत्याने जनतेला दिला आहे.

.     यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, जिल्हा कार्याध्यक्ष गुरूदास गुरनुले, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख भोजराज गोवर्धन, तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, जिल्हा सदस्य अशोक येरमे, रमेश माहुरपवार, विनायक रेकलवार उपस्थित होते.