भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

65
  • भेंडाळा फाट्या जवळील घटना

सिंदेवाही : नागपूर कडून सिंदेवाही कडे जात असलेल्या भरधावं ट्रकने दुचाकीला मागावून धडक दिली यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खातगाव – भेंडाळा फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सोनू रमेश कुंभारे (२६) राहणार डोंगरगाव असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे.

.       सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथील सोनू कुंभारे हा युवक आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३४ एएफ ४६२१ ने पळसगाव (जाट) येथे गेला होता. आपले काम आटोपून रात्रीच तो सिंदेवाही मार्गे गावाकडे परत येत असताना त्याच मार्गाने एमएच ३४बीजी ४८१८ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत असताना ट्रकने दुचाकीला मागावून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक सोनू रमेश कुंभरे हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची चौकशी करून मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मधुकर पेंदाम करीत आहेत.