भरधाव स्विफ्ट कारची पुलाला जबर धडक

49
  • ५ जण गंभीर
  • नागभीड तालुक्यातील घटना

नागभीड :  ब्रम्हपूरी वरून सिंदेवाही कडे जात असलेल्या भरधावं स्विफ्ट कारच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पळसगाव खुर्द जवळील बोकडडोह नाल्यावरील पुलाला जबर धडक दिली. यात स्विफ्ट कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले. सदर घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.

.      प्राप्त माहितीनुसार नागभीड तालुक्यातील वाढोणा व सिंदेवाही येथील ५ जण काही कामानिमित्त ब्रम्हपुरी येथे सिप्टी कार क्रमांक एम. एच. ३४ -बि.एफ. ७४४८ ने गेले होते. ब्रम्हपुरी वरून आपले काम आटोपून परत सिंदेवाही कडे येत असताना सिप्टी कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. आणि पळसगाव खुर्द जवळील बोकडडोह नाल्यावरील पुलाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की यात स्विफ्ट चा समोरील भाग चकनाचूर झाला व पुलाचा पिल्लर ही खचला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून पाच ही जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. या अपघात नागभीड तालुक्यातील वाढोणा येथिल हरिचंद्र जिगरवार, व दोन जण वाढोणा येथिल रहिवाशी आहेत तर सिन्देवाही येथिल संकेत कटारे व अन्य एक जण सिन्देवाही येथिल रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.

.      घटनेची माहिती नागभिड पोलिसांना मिळताच ठाणेदार विजय राठोड व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी ब्रम्हपूरी येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहेत.