Home पोलीस डायरी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या वृद्धावर वाघाचा हल्ला

जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या वृद्धावर वाघाचा हल्ला

1273
  • बल्लारपूर वन परीक्षेत्रातील घटना

विसापूर : बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डातील इसम सरपण गोळा करण्यासाठी बुधवार दि. १3 रोजी बल्लारपूर वन परीक्षेत्रातील कारवा जंगलात गेला. मात्र तो जंगलातून घरी परत आलाच नाही. याची माहिती वन विभागाला देण्यात आली.वन विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान कारवा जंगलात त्याचे प्रेत आढळून आले. ही घटना आज गुरुवारी उघडकीला आली असून वाघाने वृद्धाला ठार केले. वाघाने ठार केलेल्याचे नाव नामदेव मोतीराम आत्राम (५८) रा.विद्यानगर वार्ड,बल्लारपूर असे आहे.

.       नामदेव आत्राम हे बुधवारला सकाळी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले होते.पूर्ण दिवस व रात्र होऊन देखील ते घरी परत आले नाही.यामुळे घरातील नातेवाईक चिंताग्रस्त झाले.याची माहिती बल्लारपूर वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना देण्यात आली. सकाळी वन विभागाचे कर्मचारी व मजुरांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबविली.शोध मोहिमे दरम्यान बल्लारपूर वन परीक्षेत्रातील राखीव वनखंड क्रमांक ४९४ मध्ये नामदेव आत्राम यांचा मृतदेह आढळून आला.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरभक्षी वाघाने नामदेवावर हल्ला करून ठार केल्याचे निष्पन्न केले.

.       या घटनेचा पंचनामा करून मृतक नामदेवचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे हलविण्यात आले. वन विभागाने मृतकाच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान दिले,असून पुढील कारवाई चंद्रपूरच्या मध्य चांदा वन विभागाच्या उपवानसरक्षक स्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे व वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करत आहे.
नरभक्षी वाघाच्या वावरामुळे नागरिक भयभीत झाले आहे. यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावर उपाययोजना म्हणून नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी बल्लारपूर वन विभागाने वाघाचा वावर लक्षात घेऊन १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहे.त्याच प्रमाणे ४ लाईव्ह कॅमेरेच्या माध्यमातून नरभक्षी वाघावर नजर ठेवली जात असल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.

error: Content is protected !!