- आमदार प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते भूमिपूजन
वरोरा : तालुक्यातील चारगाव खुर्द ते अर्जुनी कोकेवाडा पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज शुक्रवार दि. ८ मार्च रोजी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. ३ कोटी ३२ लाख रुपये या रस्त्याच्या कामावर खर्च होणार आहेत.
. वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द ते अर्जुनी कोकेवाडा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली होती. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन हा प्रश्न सरपंच राजू चिकटे यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे मांडला. तेव्हा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लगेच या रस्त्याच्या कामाला सहमती दर्शवून या ७ किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी तीन कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर केले. आणि या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज ८ मार्च रोजी पार पडले.
. यावेळी चारगांव खुर्द चे सरपंच तथा कृऊबा वरोरा चे माजी सभापती आणि विद्यमान संचालक राजेंद्र चिकटे , प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय लोहे, कनिष्ठ अभियंता व्ही. आर. धोत्रे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरोरा येथील अभियंता अरुण झाडे, चारगाव खुर्द येथील सुलखा दडमल, वनीता कष्टी, इंदिरा पावडे ग्रा प. सदस्प, योगेश खामनकर ,सचिन चवले, मंगल चवले, शरद मोडक, अभय धोबे व ग्रामस्थ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रस्त्याचे काम हाती घेऊन त्या कामाचे भूमिपूजन केल्याने गावकऱ्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना धन्यवाद दिले आहे.


