बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच समाजाची प्रगती होइल : डॉ. सतिश वारजुकर

74

दिघोरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न

ब्रम्हपुरी : बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने आचरणात आणि बुद्धाच्या पंचशिलाच्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगती होइल. म्हणुन दररोज विहारात वंदना झाली पाहिजे. डॉ बाबासाहेब यांच्या विचारावर समाज गेला पाहिजे. असे प्रतिपादन भिक्कू निवासाचे उदघाटन व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजुकर यांनी केले.

.        विश्वशांती पवारणा धम्मभूमी सेवा समिती दिघोरी (नान्होरी) यांच्या संयुक्त विद्यमाने माघ पौर्णिमा निमित्त बौद्ध धम्म परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यकर्माच्या प्रसंगी सकाळी 9 वाजता भिखु संघाद्वारे धम्म ध्वजारोहण करण्यात आले. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार अभिवादन करुण समता सैनिक दल शाखा ब्रम्हपुरी परिसरातील समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान पूर्वक मानवंदना देवून कार्यक्रमाला सुरवात झाली.

.        दुसऱ्या सत्रामध्ये भिक्कू निवासाचे उदघाटन व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटक राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक, ग्रामपंचायत सरपंच नान्होरी शुभांगी राऊत, डी. के. मेश्राम, नीरज खोब्रागडे, कपिल राऊत, मदन शेंडे, नरेश रामटेके, अशोक मेश्राम, किशोर खापर्डे उपस्थित होते,