प्रेम प्रकरणातून खून केल्याचा संशयम
महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकातील घटना
विसापूर : बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौक परिसरात एक तरुणी राहत होती. तिचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. याच प्रकरणात आरोपीने तिची निर्घून हत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकात घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हत्या झालेल्या तरुणीचे नाव रक्षा कुमरे (२२) रा. महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौक बल्लारपूर असे असून आरोपी सिनू दहागावकर (२९) असे असून तो घरून फरार झाल्याची माहिती आहे.
. बल्लारपूर येथील महाराणा प्रताप वार्ड,सम्यक चौकात आरोपी सिनू दहागवकर हा आई रामबाई सोबत राहत आहे.त्याची आई रामबाई ही आज शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घरी आली.त्यावेळी घरात एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले.तिचा मुलगा सिनू हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. तो अलीकडेच तुरुंगातून बाहेर आला.त्याने आज सायंकाळी स्वतःच्या घरी बोलावून घेतले.
. रक्षा ही घरी आल्यावर सिनू च्या मनात वेगळाच कट होता. ती सिनुच्या घरी येताच प्रेम प्रकरणावरू दोघात वाद झाला. वादाची सिमा पराकोटीला गेली. दोघांत कडक्याचे भांडण झाले. सिनूचा संयम सुटला. त्याने रक्षाच्या डोक्यावर वार करून घरातून पळ काढला. ही वार्ता वाऱ्याच्या झोतात वार्डात पसरली. वार्डातील लोकांनी महाराणा प्रताप वार्डातील एकच गर्दी केली. त्याच दरम्यान बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक असिफराजा शेख पोलीस ताफा घेऊन घटना स्थळी दाखल होऊन घटनेचा तपास करत आहे.