Home सामाजिक भद्रावतीत ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे भव्य स्वागत

भद्रावतीत ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे भव्य स्वागत

1148

भद्रावती : सेवाग्राम येथील बापू कुटी महात्मा गांधी आश्रम येथून काढण्यात आलेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे भद्रावती शहरात स्थानिक ओबीसी महासंघाद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. या स्वागताला ओबीसी विजे- एनटी, एसबीसी, आदिवासी तथा अन्य बांधव सहभागी झाले होते.

.         12 फेब्रुवारीला सदर यात्रा चंद्रपूर येथे पोहोचल्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रा चंद्रपूरला जाण्यापूर्वी दिनांक 11 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता भद्रावती शहरात पोहोचली शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार चौकात या यात्रेचे ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा ढोल ताशाच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगरपरिषद, गांधी चौकात आल्यानंतर ती परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर तिचे एका जाहीर सभेत रूपांतर झाले. या सभेत यात्रेसोबत आलेल्या वरिष्ठ  मान्यवरांचे उपस्थित ओबीसी बांधवांना अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

.         ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, मराठ्यांचे सरसकट ओबीसी करण करू नये, सगेसोयरे संबंधीची अधिसूचना रद्द करावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यांना घेऊन व त्याचे ओबीसी समाजामध्ये जनजागरण करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रेचे स्वागत करण्यासाठी एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, आदिवासी नेते रमेश मेश्राम, लक्ष्मण बोढाले, पांडुरंग टोंगे, सुनील आवारी, एडवोकेट महेश ठेंगणे, उमेश काकडे, लिमेश माणूसमारे, संजय आसेकर, मुकेश जीवतोडे, प्रशांत झाडे आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

error: Content is protected !!