बुलठाणा (प्रतिंनिधी)
आरोग्यामध्ये भारतामध्ये वाढते कॅन्सर चे प्रमाण मुख्यतो गर्भाशयाचा, मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण करणार आहे. आयुष्मान भारत पीएमजेएवाय सर्व आशा,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांना विस्तारित केले जाईल. 9 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरण सुरू केले जाईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील.
देशातील गरीब वर्गाला घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी 2 कोटी घरे बांधली जातील 40 हजार जनरल बोगी वाढवणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “तीन मोठे आर्थिक रेल्वे कॉरिडॉर कार्यान्वित केले जातील. यात 1) ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर, 2) पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर, 3) हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर यांचा समावेश असेल. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. पंतप्रधान गति शक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल.


