प्रतिनिधी बुलढाणा-
. येणान्या सर्वच निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी तसेच शासनाच्या सर्व योजना शेवटच्या माणसाच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहीजे यासाठी गाव चलो अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
. भाजपच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यामध्ये लाखनवाडा या गावी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ पंकज जी भिवटे यांनी गावमध्ये विविध घटकांच्या भेटी घेऊन त्यांच्या शी संपर्क करुन घरोघरी जाऊन मतदारांच्या व जनतेच्या भेटी घेतल्या आणि मोदी सरकारकडून होत असलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची माहिती दिली. तसेच मोदी सरकार बद्दल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेच्या मनातील कौल ऐकून घेतला. व्यापारी वर्गाकडून व शेतकरी वर्गाकडून काही नवीन सूचना सुद्धा घेऊन आणि मेंढपाळ बांधवांच्या वाड्या वस्तीवर सुद्धा भेटी देत समस्या जाणून घेतल्या पाटबंधारे विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय जी पांढरे यांच्या निवासस्थानी भेट दिली डॉ गुफ्रान यांच्या निवस्थानी यावेळी गावचे माजी सरपंच पांडुरंग भिवटे,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू पांढरे,गावचे पोलिस पाटील राजू पांढरे पाटील ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष गजानन भिवटे,डॉ गुफरान, सोपान हटकर,ओम पांढरे अन्सार शेख आदि उपस्थित होते मा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव चलो अभियानांतर्गत जनतेच्या भावना ऐकून पेठ परत मोदी सरकार सत्तेमध्ये करणारच अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून दिसून येत होत्या.

