अवैध रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर वरोरा पोलिसांनी पकडले

389

वरोरा : अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरुद्ध महसूल व पोलीस प्रशासनाने कंबर कसली असुन रविवारी अवैधरित्या रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर वरोरा पोलिसांनी पकडला असुन ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करीत एकाला अटक केली आहे.

.        जिल्ह्यातील रेती घाटांचे डेपो लिलाव झाले असले तरी रेतीचे डेपो अद्याप रेती विक्रीस सुरू झाले नसून बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काही रेती घाटांवरून छुप्या पद्धतीने रेतीची चोरी होत आहे. याला आळा घालण्यासाठी महसूल विभागा प्रमाणे पोलीस विभागही सज्ज झाला आहे. पोलीस विभागाच्या वतीने रेती तस्करांवर करडी नजर ठेवली जात असून रविवारी (दि ११) सकाळी 11 वाजता करंजी घाटातून रेती भरून घेऊन जात असलेला ट्रॅक्टर क्र. एमएच 34 सीडी 8554 वर जप्तीची कारवाई करीत जितेंद्र बुधराम वर्मा रा. नायगाव याला अटक करण्यात आली. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वात एपीआय योगेंद्रसिंग यादव, पो. कॉ. महेश गावतुरे यांनी कारवाई केली.